
PM Modi in Mumbai: "अजून बरेच प्रकल्प आपली वाट पाहताहेत"; मोदींना CM शिंदेंनी दिलं भविष्यातलं निमंत्रण
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत विविध प्रकल्पांचं लोकार्पण झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना भविष्यातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाचं निमंत्रणही देऊन टाकलं. यावेळी मोदींच्या हस्ते दोन वंदे भारत ट्रेन्सचं लोकार्पण करण्यात आलं. (PM Modi in Mumbai more projects awaiting for you CM Shinde invited Modi to inaugurate future projects)
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये तुमचं सहकार्य मिळतंय हे महत्वाचं आहे. इतिहासात कधीही इतके राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात बनले नव्हते. केंद्राच्या सहकार्यानं हे सर्व होत आहे. तसेच आमच्या सहा-सात महिन्यांच सरकार आपल्या आशिर्वादानं बनलं आहे.
अनेक प्रकल्प आपली वाट पाहत उभे आहेत - शिंदे
या सर्वसामान्यांच्या सरकारच्या काळात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच उद्घाटन तुमच्या हस्ते झालं, आता लाखो लोक याचा फायदा घेत आहेत. तसेच मुंबईत मेट्रोचा शुभारंभ झाला याचाही लाखो लोक फायदा घेत आहेत. यानंतर आता वंदे भारत ट्रेनचाही लाखो लोक फायदा घेतील. पुढेही आमचे अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये एमडीएचएल, मेट्रोचे अनेक मार्ग आहेत, पुणे-मुंबई मिसिंग लिंक असे अनेक प्रकल्प आपली वाट पाहत उभे आहेत. आम्ही तुम्हाला त्यावेळी बोलावू, तुम्हाला विनंती करु तेव्हा तुम्ही निश्चितपणे आम्हाला सहकार्य करालं, अशी आशा आहे.
हे ही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
तुमचं पर्यायानं देशाचं ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं जे स्वप्न आहे, त्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचं जे १ ट्रिलियन डॉलरचं टार्गेट आहे, ते ही योगदान आम्ही देण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिलं.