PM Modi Road Show: "मोदी, भाजप अन् महायुतीला शोभतं का?" पंतप्रधानांच्या रोड शोमुळे , मुंबईकरांचा संताप

PM Modi Rally: यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेचे कारण देत मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला होता. याचबरोबर काही मेट्रो स्थानकांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
PM Modi Road Show
PM Modi Road ShowEsakal

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काल मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेचे कारण देत मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला होता. याचबरोबर काही मेट्रो स्थानकांवरी वाहतूक बंद करण्यात आली होती.

दरम्यान पंतप्रधान मोदींचा हा रोड शो सायंकाळी होता. आणि याच दरम्यान लोकांची कामावरून सुट्टी होते. वाहतूक व्यवस्थेत केलेले बदल आणि बंद ठेवलेल्या मेट्रो स्थानकांमुळे लोकांची मोठी तारंबळ उडाली होती. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (PM Modi Road Show)

यावेळी वैभव छाया नावाच्या इन्स्टाग्राम युजरने एका व्हिडिओसह पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. हा युजर आपल्या पोस्टमध्ये म्हणाला, " मोदींच्या 'रोड शो'मुळे मुंबईच्या जनतेला याप्रकारे थांबवून ठेवलं होत. हे मोदी, भाजप आणि महायुती ला शोभतं का?? अवघड आहे. जनतेला त्रास देऊन मतं मागणाऱ्याला मुंबईची जनता मतं देणार नाही."

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधांनाच्या मुंबईतील या रोड शो वर टीका केली आहे. पवार म्हणाले, मुंबईसारख्या ठिकाणी रोड शो आयोजित करणे हे काही शहाणपनाचे लक्षण नाही. लोकांना तासंतास थांबावे लागते, ट्राफिक परिस्थितीही भयंकर होते."

दुसरीकडे एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अनेक मुंबईकर संताप व्यक्त करत आहे. त्यापैकी एका युजरने मेट्रोमधील व्हिडिओ शअर करत म्हटले की, "मी सध्या अंधेरी मेट्रोमध्ये उभा आहे. गेल्या 15 मिनिटांपासून मेट्रो एक इंचही हलली नाही. कारण आपले चौकीदार आपली फकिरी दाखवण्यासाठी घाटकोपरमध्ये आले आहेत."

PM Modi Road Show
बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी सांगितलं कारण...
PM Modi Road Show
Sharad Pawar: "नरेंद्र मोदींना मी इस्त्राइलला घेऊन गेलो होतो"; शरद पवारांनी संपूर्ण इतिहास काढला

ईशान्य मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) येथील अशोक सिल्क मिल येथून सायंकाळी सातच्या सुमारास भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदी यांचा रोड शो सुरू झाला होता. आणि शहराच्या विविध भागातून पुढे जात घाटकोपर (पूर्व) येथील पार्श्वनाथ चौकापशी संपला.

पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ईशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि उज्ज्वल निकम हेही यावेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com