esakal | मोदींच्या मंत्रिमंडळातील मूळ चेहरा शिवसेना, राष्ट्रवादीचाच!
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

मोदींच्या मंत्रिमंडळातील मूळ चेहरा शिवसेना, राष्ट्रवादीचाच!

sakal_logo
By
विराज भागवत

संजय राऊत यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक वक्तव्य

मुंबई: राज्यातील चार खासदारांना (Maharashtra MP) केंद्रात मंत्रिपद (Central Ministry) देण्यात आलं. देशाचा कारभार त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. देशात आर्थिक, आरोग्य, रोजगार अशा जबाबदाऱ्या त्यांना सांभाळाव्या लागणार आहेत. प्रकाश जावडेकरांसारखा (Prakash Javadekar) अनुभवी आणि ज्येष्ठ मोहरा पडला याचं नवल वाटतंय. पण नारायण राणे (Narayan Rane), भारती पवार (Bharti Pawar), कपिल पाटील (Kapil Patil) यांसारख्या चेहऱ्यांना संधी (New Faces) देण्यात आली आहे. कपिल पाटील आणि भारती पवार हे राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट (Product of NCP) आहेत तर नारायण राणे हे मूळ शिवसेनेचे (Shivsena) होते नंतर ते भाजपमध्ये गेलेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आम्ही त्यांना केलेल्या पुरवठ्याबद्दल दोन्ही पक्षांचे आभार (PM Modi Should Thank Shivsena NCP) मानले पाहिजेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळावर खोचक शब्दात वक्तव्य केली. (PM Modi selected Narayan Rane Bharti Pawar Kapil Patil who were originally from Shivsena NCP taunts Sanjay Raut)

हेही वाचा: बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज पोहोचवणारा सुफियान NCBच्या ताब्यात

Narayan Rane

Narayan Rane

"केंद्रात जर तुम्ही पाहिलंत तर अनेक जुने जाणते लोक बाजूला सारण्यात आले आहेत. त्या जागी नव्या आणि युवा लोकांना संधी दिली आहे. या नव्यांना त्यांच्यातील सक्षमता पाहून संधी दिली गेली असेल असं मी मानतो. या सर्व नव्या मंत्र्यांना मी शुभेच्छा देतो. या सर्वांनी महाराष्ट्रातील जडणघडणीत योगदान द्यावं. विशेषत: आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आता लसीकरणाचा जो घोळ होता तो नीट दुरूस्त करावा. नारायण राणे यांनी रोजगार निर्मितीतून युवकांना संधी द्यावी", असं मतही संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

loading image