Devendra Fadnavis: "मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा राबवणार"

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी पार पडली. त्यात 'हे' महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
PM Modi Devendra Fadnavis
PM Modi Devendra Fadnavise sakal
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्य़क्षतेखाली आज सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा राबवण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आला आहे.

PM Modi Devendra Fadnavis
Pune Rain: ...अन् चेंबरमधला कचरा हाताने काढत पोलिसांनी साचलेल्या पाण्याला वाट करून दिली!

याव्यतिरिक्त कोविड काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना नोकरीत फायदा मिळावा यासाठी गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे कंत्राटी कामावर असलेले वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अशी कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी जेणे करून भरतीच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी असेही ठरले.

PM Modi Devendra Fadnavis
Nitin Gadkari: गडकरींची उडणारी बस नुसतं आश्वासन नाही; मंत्रालय Action Mode मध्ये

याशिवाय, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रनेता से राष्ट्रपिता' हा सेवा पंधरवडा राबवणार असल्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्याचसोबत कोविड लसीचा बूस्टर डोस द्यायची मोहीमही वेगाने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com