
Navi Mumbai Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता. १५) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. खारघर येथे इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत उभारण्यात येत असलेल्या श्री श्री राधा मदनमोहन मंदिराचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
गेला आठवडाभर या मंदिरात राधा मदनमोहन यांच्या प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा केला जात आहे. खारघर सेक्टर २३ येथे इस्कॉनतर्फे अतिशय कलाकुसर करून भव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.