Mumbai:वंदे भारता ट्रेनकडे साईभक्तांची पाट ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंदे भारत रेल्वे गाड्या असणार आहे.

Mumbai : वंदे भारता ट्रेनकडे साईभक्तांची पाट !

नितीन बिनेकर

मुंबई - साईभक्तांसाठी मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत सुपरस्टार एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. मात्र, या गाडीला शनिवार- रविवारी सोडला तर इतर दिवशी साईभक्तांचा प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे मध्य रेल्वेकडून प्रवासी वाढविण्यासाठी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साईबाबाचे दर्शनासाठी व्हीआयपी तिकीट देण्याचा विचार सुरू आहे. यांसदर्भात लवकरच श्री साईबाबा संस्था ट्रस्टबरोबर मध्य रेल्वेचकडून प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला १० फेब्रुवारी २०२३ ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित सेवा ११ फेब्रुवारी २०२२ पासूनसुरू झाली आहेत.

परंतु, वंदे भारत ट्रेनच्या प्रवासात विमान प्रवासाचा फील येत असला तरी ही गाडी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सर्वसामान्य साईभक्तांच्या आवाक्याबाहेर असल्याचे समोर आले आहे.

सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत ट्रेनच्या चेअर सीटसाठी ८४० रुपये तर एक्झिक्युटिव्ह कोचमधील सीटसाठी तब्बल १ हजार ६७० रुपये मोजावे लागतात. तसेच कॅटरिंगसह तिकीट घेतल्यास चेअर करसाठी ९७५ रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १८४० रुपये एवढे तिकीट लागणार आहे.

या उलट दादर -शिर्डी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या स्लीपर सीटला केवळ २५५ रुपये सीट आहे. त्यामुळे वंदे भारतचा प्रवास सर्वसामान्य साईभक्तांच्या आवाक्याबाहेर असल्याने या गाडीला प्रतिसाद मिळत नाही.

फक्त शनिवार- रविवार सुट्यांचे दिवस सोडले तर,या गाडीला प्रतिसाद मिळत नाही आहे.

(आसन क्षमता- १२८२)

दिवस- प्रवासी- टक्के

रविवार- १०८२ - ९५. ९२ टक्के

सोमवार- ५५८ - ४९.४६ टक्के

बुधवार- ७७६ - ६८.७९ टक्के

गुरुवार -५७६ - ५१.०६ टक्के

शुक्रवार -९२५- ८२ टक्के

शनिवार- ११३१- १००.२६ टक्के

साईनगर शिर्डी- मुंबई वंदे भारत-

दिवस- प्रवासी- टक्के

रविवार- ५२८ - ४६.०८ टक्के

सोमवार- ११५८ - १०२.६५ टक्के

मंगळवार- ७३४ - ६५.०७ टक्के

बुधवार- ५८७ - ५२.०३ टक्के

गुरुवार -५३५- ४७.४२ टक्के

शुक्रवार -६७३- ५९.६६ टक्के

शनिवार- ८६९- ७६.८६ टक्के

महाव्यवस्थापकांचा सूचना

मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला सुरू होऊन आठ दिवस झाली आहे. परंतु, या ट्रेनला शनिवार- रविवार सोडून गाडी रिकामी धावत आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनकडे प्रवाशांचा ओघ वाढविण्यासाठी मध्य रेल्वेकडून आता प्रयत्न सुरू केले आहे.

त्यासंदर्भात सूचनाही रेल्वे महाव्यवस्थापकानी अधिकाऱ्यांना दिल्या आहे. वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साईबाबाचे दर्शनासाठी व्हीआयपी तिकीट देण्याचा विचार सुरू आहे.

यांसदर्भात लवकरच श्री साईबाबा संस्था ट्रस्टबरोबर मध्य रेल्वेकडून प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

सोलापूर वंदे भारत

मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे स्लीपर कोचचे तिकीट २५४ रुपये असून द्वितीय वातानुकूलित कक्षाचे तिकीट ८९५ रुपये आहे. त्यातुलनेत सीएसएमटी-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे चेअर कोचसाठी १०१० रूपये तर एक्झिक्युटिव्ह कोचचे २०१५ रुपये एवढे तिकीट आहे.

त्यामुळे तिकीट दर जास्त असल्याने सोलापूर मुंबई वंदे भारत ट्रेन पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता प्रवाशांमध्ये वंदे भारत लोकप्रिय होण्यासाठी मध्य रेल्वेकडून आता प्रयत्न सुरू केले आहेत.