आता माफियागिरीला माफी नाही - नरेंद्र मोदी

सुजित गायकवाड
Wednesday, 16 October 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतील खारघरमध्ये जाहीर सभा पार पडली. आता नवी मुंबईत माफियागिरीला माफी नाही असं नरेंद्र म्हणालेत. गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पण 2014 च्या आधी महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफिया यांच्या नातेसंबंधांचे काळे डाग काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष धुवू शकले नाही. रेरासारख्या कायद्यामुळे काँग्रेस-एनसीपीची दुकाने बंद झालीत. जो बिल्डर स्थानिक शेतकऱ्यांसोबत प्रामाणिकपणे काम करेल त्यांच्यासोबत आम्ही राहू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतील खारघरमध्ये जाहीर सभा पार पडली. आता नवी मुंबईत माफियागिरीला माफी नाही असं नरेंद्र म्हणालेत. गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पण 2014 च्या आधी महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफिया यांच्या नातेसंबंधांचे काळे डाग काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष धुवू शकले नाही. रेरासारख्या कायद्यामुळे काँग्रेस-एनसीपीची दुकाने बंद झालीत. जो बिल्डर स्थानिक शेतकऱ्यांसोबत प्रामाणिकपणे काम करेल त्यांच्यासोबत आम्ही राहू. रियल इस्टेट क्षेत्रामुळे घरांचं उत्पादन आणि निर्मिती होते, रोजगारही निर्माण होतोय असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.  

या सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीतून केली. दरम्यान रायगडमध्ये येऊन मला आनंद होत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणालेत.शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा मिळते, शिवाजी महाराजांच्या भूमीत पुन्हा यायचं म्हणजे प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि यासारखं दुसरं भाग्य नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. 

नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील भाषणातील मुद्दे 

 • शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा मिळते, शिवाजी महाराजांच्या भूमीत पुन्हा यायचं म्हणजे प्रेरणा घेण्यासारखं दुसरं भाग्य नाही 
 • त्याच प्रेरणेतून महायुतीने कर्तव्य पार पडले आहे
 • पनवेल पासून सर्व ठिकाणी आम्ही बरोबर दिशेने काम करीत आहोत
 • सुटी नसतानाही दुपारी एवढी मोठी सभा येथे आयोजित केली आहे. एकाहून एक रॅली पाहतोय. सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 
 • तुम्ही मला सांगा जगभरातून जेव्हा भारताच्या सन्मानाच्या बातम्या ऐकू येतात तेव्हा तुम्हाला आनंद होतो की नाही ? असा सवाल मोदींनी विचारलाय 
 •  देश आज मोठी मोठी आव्हाने स्वीकारत आहेत
 • भारताला महान राष्ट्र तयार करण्यात महाराष्ट्रच मोठं योगदान आहे. 
 • देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं 
 • दिल्लीत नरेंद्रला हृदयापासून बसवलं. आता मुंबईत देवेंद्र बसवा.
 • नरेंद्र आणि देवेंद्र फॉर्म्युला सुपरहिट ठरला आहे. देवेंद्र-नरेंद्र एकत्र उभे असतात तेव्हा एक अधिक एक दोन होत नाही तर अकरा होतात
 • आज भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप असणारा देश 
 • महाराष्ट्राच्या तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे.
 • परदेशी गुंतवणुकीचा मोठा हिस्सा महाराष्ट्रात आला आहे.
 • येणाऱ्या 100 कोटी गुंतवणुकीतील सर्वात जास्त लाभर्ती महाराष्ट्र होणार आहे.
 • देवेंद्र आणि नरेंद्र हे डबल इंजिन महाराष्ट्राच्या विकासाला ताकद देतेय 
 • - गेल्या वर्षी नवी मुंबई एअरपोर्ट आणि जेएनपीटीचे भूमिपूजन करताना संगीतले होतं, की गेल्या सरकारने चांगले प्रकल्पाच्या फाईल्स दाबून ठेवल्या होत्या. हे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत
 •  
 • लवकरच नवी मुंबईतून विमान उडेल
 • सिलिंकवरून वाहने धावतील. मेट्रो सेवा सुरू होईल.
 • कोट्यवधी रुपये खर्च करून उभे राहत असणारे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा खऱ्या अर्थाने विकास होईल
 • समुद्रतट कनेक्टिव्हिटी सशक्त करण्यासाठी सागरमला योजना आणली जात आहे.
 • कोकणात गेल्या पाच वर्षात अनेक जेट्टी आणि टर्मिनल तयार केले आहेत
 • विविध पर्यटक या ठिकाणी भेट देतील
 • ब्ल्यू इकॉनॉमिमार्फत समुद्रात जास्तीत जास्त संशोधन स्थानिक मच्छीमारांना फायदा व्हावा.
 • समुद्र प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. 
 • मत्स्य उद्योग साठी सरकार काम करतंय. केंद्र सरकारने यासाठी वेगळा विभाग तयार केला आहे. सोप्या आणि सहज कर्ज प्राप्त करण्यासाठी हे मंत्रालय करतंय.
 • पेण, पनवेल, बेलापूर, ऐरोली, डोंबिवली ही नवीन उर्जास्थाने आहेत
 • छतावरील पावसाच्या पाण्याचा वापर चांगला करा. छतावरील पाणी वापरण्यासाठी बाजारात विविध पद्धती उपलब्ध आहेत. 
 • 2014च्या आधी महाराष्ट्रात रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफिया यांच्या नातेसंबंधांचे काळे डाग काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष धुवू शकले नाही. 
 • रेरासारख्या कायद्यामुळे काँग्रेस-एनसीपी ची दुकाने बंद होणार होती. 
 • माफियागिरी माफ नाही.. माफियागिरी साफ करणार..  
 • बिल्डर शेतकरी यांच्यासोबत प्रामाणिक काम करेल आम्ही त्याच्यासोबत राहू
 • रियल इस्टेट क्षेत्र हे घर उत्पादन करणे व रोजगार उपलब्ध होतात
 • मिडल क्लास सोबत झोपडपट्टी धारकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार 
 • पनवेल मध्ये झोपडपट्टी धारकांसाठी 2 लक्ष घरे तयार होत आहेत.

Webtitle : pm narendra modi targets real estate mafia in his navi mumbai public speech
    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi targets real estate mafia in his navi mumbai public speech