PMC Bank Scam: हितेंद्र ठाकुर यांच्या विवा ग्रुपच्या कार्यालयावर EDचा छापा

पूजा विचारे
Friday, 22 January 2021

आमदार हितेंद्र आणि क्षितीज ठाकूर यांच्या घर आणि कार्यलयावर ईडीनं छापा मारला आहे.  वसई-विरार भागात पाच ठिकाणी ईडीनं छापा टाकला आहे.

मुंबईः  सक्तवसुली संचलनालया(ईडी) ने आणखी एक कारवाई केली आहे. आमदार हितेंद्र आणि क्षितीज ठाकूर यांच्या घर आणि कार्यलयावर ईडीनं छापा मारला आहे. वसई-विरार भागात पाच ठिकाणी ईडीनं छापा मारला आहे.  PMC बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं ही धाड टाकली आहे.  

विरारच्या विवा ग्रुपमध्ये ईडीकडून चौकशी सुरू आहे. विरार पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील विवा सुपर मार्केटमधील विवा  ग्रुपच्या कार्यालयात ही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर एसआरपी तैनात करण्यात आली आहे.  HDIL कंपनीचे मालक राकेश वाधवान यांनी ईडीच्या चौकशीत दिलेली माहिती खरी आहे का? विवा ग्रुप चा यांच्यात काय संबंध आहे. ही सर्व सत्यता पडताळात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विवा ग्रुप हा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा आहे. या छापेमारीनंतर ठाकुर कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. अद्यापही ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. 

हेही वाचा- रेणू शर्मांनी तक्रार मागे घेताच वकील रमेश त्रिपाठींचा केसला रामराम

pmc bank scam ED Raid hitendra thakur Viva Group vasai virar palghar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmc bank scam ED Raid hitendra thakur Viva Group vasai virar palghar