
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष गेल्या १३ वर्षांपासून सुरू आहे. २०१२ पासून त्यांच्या पगारात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही. वाढत्या महागाईच्या काळात तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना अशक्य झाले आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक किशोर मोरे यांनी सांगितले, "आम्ही निवेदने, आंदोलने केली, पण शासनाला जाग येत नाही. आता जगणे कठीण झाले आहे."