Crime News : अकासा एअर विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीला हल्ल्याची धमकी; 18 वर्षीय तरुणाला सुरतमधून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akasaair

Crime News : अकासा एअर विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीला हल्ल्याची धमकी; 18 वर्षीय तरुणाला सुरतमधून अटक

मुंबई : अकासा एअरला धमकीचा संदेश पाठवल्याप्रकरणी सहार पोलिसांनी गुरुवारी सूरतमधील 18 वर्षीय बारावी कक्षेतील विद्यार्थ्याला सुरतमधून अटक केली आहे. आरोपी विद्यार्थ्याने सोशल मीडियावर एअरलाइन कंपनीच्या हॅण्डलला टॅग करत संदेश लिहिले होते.

या संदेशात की, “तुमचे बोईंग 737 मॅक्स विमानात घातपात केला जाईल.” अशा आशयाचा संदेश होता. या संदेशानंतर एअरलाइन कंपनीने नोंदवलेल्या तक्रारीनंतर सहार पोलिसांनी अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. पोलिसांना आरोपी सुरत येथे असल्याची माहिती मिळाली.

पोलिस पथकांनी आरोपीचा शोध घेण्यास गुजरातमधील सुरत येथे पोहोचले आणि येथून काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता घातपात करण्याची अशी कोणतीही योजना अथवा प्लॅन नसल्याची माहिती तपासात समोर आली. आरोपीने परिणाम समजून न घेता सोशल मीडियावर खोडसाळपणा केला. आरोपीला मुंबईतील न्यायालयाने शुक्रवारी अटीसह जामीन मंजूर केला.

टॅग्स :Mumbai Newscrime