

Police Action Over New Year Celebration
ESakal
ठाणे शहर : तळीरामांकडून थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने होत असते. तर इतर नागरिकही नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाने घराबाहेर पडतात. या नागरिकांच्या उत्साहाला गालबोट लागू नये याकरिता वाहतूक विभाग सज्ज झाला आहे. मद्यपी आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयात ८५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून ७३९ पोलिसांचे मनुष्यबळ पहारा देण्यासाठी रस्त्यावर उतरवले आहे. आयुक्तालयातील १७ उपविभाग कामाला लागले आहेत. रेस्टॉरंट, बार, धाबे आणि वाईन शॉपबाहेर देखील पोलिसांची नजर असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.