
डोंबिवली : गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे (वय 28) हा गणेशभक्तांची अडचण करून अचानक पसार झाला होता. या घटनेमुळे गणेशभक्त मोठ्या अडचणीत सापडले होते. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची पथक प्रफुल्ल याचा शोध घेत होती. अखेर सातारा येथून तांबडे याला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.