लॉकडाऊनमध्ये अतिहुशारी... 31 हजार गाड्या जप्त, दोन कोटींचा दंड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशात कोरोनाचे थैमान आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन सुरू केल्यानंतरही काही नागरिक त्याचे पालन करत नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी अद्दल घडवली आहे.
राज्यभरात 31 हजार 296 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. एक कोटी 70 लाखांचा दंडही वसूल केला गेला आहे. विशेष म्हणजे,  46 हजार 671 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्त्वाचं : गाडी घेऊन बाजारात जाताय? दंड होईल!

कोरोना रुग्णांना आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण अनेक महाभागांकडून त्याचे उल्लंघन सुरू आहे. परिणामी पोलिसांनी राज्यभरात धडक कारवाई आणि नाकांबदी लावली आहे.

हेही वाचा : जरा विचार करा, ते स्थलांतरित निघून गेले तर मुंबईचे काय?

खासगी वाहनांना विना परवाना बाहेर फिरण्यास सक्त मनाई असतानाही काही नागरिक दुचाकी-चारचाकी घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. राज्यभरातून अशा 31 हजार 296 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत एक कोटी 70 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल आहे.  

राज्यभरात 46 हजार 671 गुन्हे 
राज्यभरात पोलिसांवर हल्ल्याची 97 प्रकरणे घडली आहेत. त्यात 162 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत धारावी, गोवंडी आदी परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या. संचारबंदीदरम्यान बाहेर फिरल्याप्रकरणी राज्यभरात 46 हजार 671 गुन्हे दाखल झाले आहेत.  कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतही 709 वाहने जप्त 
मुंबईतील अवैधरित्या वाहन बाहेर काढल्याप्रकरणी 709 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तर मुंबईत सर्वाधित म्हणजे 254 गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पूर्व मुंबईत 165 गाड्या जप्त करण्यात आल्या. दक्षिण मुंबईत 95 , मध्य मुंबई 109 व पश्चिम मुंबईत 86 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com