सलमानच्या घराबाहेर फॅन्सवर पोलिसांचा लाठीचार्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Birthday

सुपरस्टार सलमान खानने मंगळवारी त्याचा 57 वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. या खास प्रसंगी सलमानची एक झलक पाहण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर त्याचे चाहते जमा झाले.

Salman Khan : सलमानच्या घराबाहेर फॅन्सवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई - सुपरस्टार सलमान खानने मंगळवारी त्याचा 57 वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. या खास प्रसंगी सलमानची एक झलक पाहण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर त्याचे चाहते जमा झाले, मात्र काही वेळातच गर्दी इतकी वाढली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यादरम्यान एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सलमान खानच्या 57 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन मोठ्या धमाकेदार होते. 26 डिसेंबरच्या संध्याकाळी अभिनेत्याने मित्र आणि चित्रपट उद्योगातील लोकांसाठी पार्टी दिली होती, तर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गर्दी केली होती. त्यांच्या 'भाईजान'ची एक झलक पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहत्यांची मोठी गर्दी सलमानच्या घराबाहेर जमली होती. एवढ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही मोठा संघर्ष करावा लागला. पोलिस बॅरिकेड्स लावून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सलमान खान चाहत्यांना भेटण्यासाठी घराच्या बाल्कनीत येताच चाहत्यांची गर्दी अनियंत्रित झाली आणि पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

टॅग्स :policesalman khanBirthday