esakal | मालाडमधील तीन फेक कॉल सेंटरवर छापे, १० जणांना अटक

बोलून बातमी शोधा

fake call Centre

मालाडमधील तीन फेक कॉल सेंटरवर छापे, १० जणांना अटक

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः मुंबई पोलिसांनी मालाड येथील तीन फेक कॉल सेंटरवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत १० जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. गुरुवारी पोलिसांनी मुंबईतल्या तीन फेक कॉल सेंटरवर छापेमारी करत उद्धवस्त केली. या तीन कॉल सेंटरवर बुधवारी मालाड आणि बांगूर नगर पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने छापे टाकले.

यातील पहिला छापा मालाडमधील एस. व्ही रोडवरील लोटस बिझनेस पार्क येथे टाकण्यात आला. दुसरा छापा बांगूर नगर येथील पाम स्प्रिंग अपार्टमेंट तर तिसरा छापा हा त्याच बिल्डिंगमध्ये मारण्यात आला. या छापेमारीत पोलिसांनी ४५ कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क, १४ लॅपटॉप, २८ मोबाईल फोन, इंटरनेट राउटर्स आणि काही साहित्य जप्त केले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी: आजपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद

याच महिन्यात १७ तारखेलाही वाशी आणि सानपाडा भागात सुरु असलेल्या तीन फेक कॉल सेंटरवरही पोलिसांनी छापे मारले होते. त्या छापेमारीत पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती. बजाज फायनान्स कंपनीच्या नावानं ही टोळी फेक कॉल सेंटरवर चालवत होती. ही टोळी फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवायची आणि त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी, जीएसटी आणि इन्शुरन्सच्या नावाखाली रोख रक्कम उकळून त्यांची फसवणूक करत होती.

police busted three fake call centres in malad arrested 10 persons