ठाणे : गणेशोत्सव काळात कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ठाणे परिमंडळामध्ये दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. तर गणेश विसर्जनाच्या दिवसांमध्ये मिरवणूक संपेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. या निर्णयामुळे ठाणे शहरासह डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी आदी शहरांनाही अवजड वाहतुकीपासून दिलासा मिळणार आहे.