
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांवर गुन्हा दाखल
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) पाच माजी महापालिका आयुक्तांसह 18 अधिकाऱ्यांविरोधात (Police FIR filed on eighteen people) बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित आरोपींमध्ये तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड (Govind rathod), रामनाथ सोनावणे, एस.एस.भिसे, ई. रविंद्रन, गोविंद बोडके यांचा समावेश आहे. त्यासोबतच इमारत विकासकासह 18 जणांचा समावेश आहे.
हेही वाचा: डोंबिवली: पडले गावात उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा; कोरोना नियमांची पायमल्ली
माजी अपक्ष नगरसेवक अरुण गीध यांच्या तक्रारीनंतर प्रथमदर्शनी न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी न्यायालयात दिलेल्या दाव्यात म्हटले आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन 5 आयुक्तांसह नगर नियोजक आणि इतर अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करुन कल्याण पश्चिमेतील एका जागेवर इमारत बांधण्याची परवानगी दिली. मात्र ही परवानगी नियमांचे उल्लंघन करत दिली गेली आहे.
विशेष म्हणजे एफएसआय देण्याबाबत विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आल्याने त्यामध्ये अनियमितता केली होती. हे बांधकाम पूर्णपणे नियमांचे उल्लंघन करुन उभारण्यात आले असून पालिका अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार गीध यांनी स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे याविषयी तक्रार दाखल केली होती. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली न गेल्याने गीध यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे दिवाणी न्यायाधीश व जेएमएफसी यांनी 18 जानेवारीला पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याविषयी बाजारपेठ पोलिसांनी सांगितले, कथित आरोपींविरुद्ध फसवणूक, अनियमितता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 2004 मध्ये हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
Web Title: Police Complaint Filed On Eighteen People Including Five Former Commissioner Of Kdmc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..