
कल्याण : मनसे शहर अध्यक्षावर चार कोटींचा फसवणुकीचा आरोप; गुन्हा दाखल
डोंबिवली : बनावट सहीच्या आधारे (fake signature issue) बॅंकेच्या खात्यातून तब्बल 4 कोटी 11 लाख रुपये काढून जमीन मालक व साक्षीदार यांची फसवणूक केल्याप्रकरणी (Money fraud case) कौस्तुभ देसाई व कल्पेश देसाई यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Police fir filed) करण्यात आला आहे. कौस्तुभ देसाई (kaustubh desai) हे मनसेचे (MNS) कल्याण शहराध्यक्ष आहेत. बांधकाम व्यावसायिक गणेश म्हात्रे यांनी देसाई यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली असून देसाई यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा: वसई-विरार पालिकेचे 'अभय' कोणाला ? शिवसेना भाजपा आमने-सामने
बांधकाम व्यावसायिक गणेश यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे गणेश यांचे वडील शंकर म्हात्रे यांच्या नावे २० गुंठे जागा असून ही जागा भागीदारीमध्ये विकसित करु असे कौस्तुभ व कल्पेश देसाई यांनी सांगितले होते. गणेश व साक्षीदार साईनाथ व शंकर म्हात्रे यांचा विश्वास संपादन करुन सप्टेंबर २०११ मध्ये याविषयी बोलणी झाली होती. त्यानुसार ड्रिम होम या नावाने बांधकाम संस्था स्थापन करुन खडकपाडा येथील एचडीएफसी बॅंकेत कंपनीचे खाते चालू करतो असे देसाई यांनी म्हात्रे यांना सांगितले. त्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या.
त्यानंतर त्यांनी एचडीएफसीचे व्यवहार व सेवा बरोबर नाही असे कारण देत त्यांनी गणेश यांना जी. पी. पारसिक बॅंकेत खाते चालू करतो असे सांगितले. त्याला गणेश यांनी होकार दिला. गणेश यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता देसाई यांनी दोन्ही बॅंकेत खाते उघडली. ही बाब गणेश यांच्या सनदी लेखापालाला माहिती झाल्यावर त्याने गणेश यांना याविषयी कल्पना दिली. देसाई यांनी गणेश यांना केवळ जी.पी. पारसिक बॅंक खात्याचा व्यवहार दाखवून एचडीएफसी बॅंकेतील आर्थिक व्यवहार दाखविले नाहीत.
तसेच एचडीएफसी बॅंकेच्या चेकवर खोट्या सह्या करुन बॅंकेतून 4 कोटी 11 लाख 21 हजार रुपये विड्रॉल करुन फसवणूक केल्याचे गणेश यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे कौस्तुभ व कल्पेश देसाई यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याविषयी कौस्तुभ देसाई म्हणाले, आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. 2015 मध्ये आमची भागीदारी संपुष्टात आली असून ठरल्याप्रमाणे त्यांना त्यांचा पूर्ण मोबदला देण्यात आला आहे. मात्र अधिकचे पैसे त्यांना हवे असल्याने आता ते आमच्यावर असे आरोप करीत आहेत.
Web Title: Police Complaint Filed On Kalyan City Mns President Kaustubh Desai In Money Fraud Crime Kalyan News Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..