पनवेल महापालिकेच्या नोटीसांची केली होळी; आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

police fir
police firsakal media

नवी मुंबई : पनवेल महापालिकेने (Panvel Municipal corporation) नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटिसा (Property tax notice) दिल्या आहेत. या प्रकरणी नवी मुंबई ९५ गाव, नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका नोटिसांची होळी करून आंदोलन (strike) केले. त्यामुळे खारघर पोलिसांनी (Kharghar Police) ॲड. सुरेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह २५ कार्यकर्त्यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी (police complaint filed) गुन्हा दाखल केला आहे.

police fir
ठाण्यातील पार्किंग प्रश्‍न, कोंडीची समस्या सुटणार

कोरोना पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. नवी मुंबई ९५ गाव, नैना व इतर प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने ॲड. सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेने मालमत्ता कराच्या अवास्तव व अन्यायकारक नोटिसा नागरिकांना दिल्याने त्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी निषेध आंदोलन केले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खारघर येथील महापालिका अ प्रभाग समिती कार्यालयासमोर नोटिसांची होळी करून महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या.

कोरोना नियमावलीचे पालन न करणे, तसेच त्यांनी पोलिसांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केला. त्यामुळे खारघर पोलिसांनी समितीचे पदाधिकारी ॲड. सुरेश ठाकूर, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक रवींद्र भगत, गोपाळ भगत, केसरीनाथ पाटील, फारुक पटेल, गुरुनाथ खडतर, जगदीश ठाकूर, इस्माईल पटेल, ॲड. विजय घाडगे, संतोष गायकर व इतर १५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com