esakal | हवालदाराचा अपघाती मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस ठाण्यातील हवालदाराचा अपघाती मृत्यू

कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यातील हवालदाराचा शनिवारी (ता. 9) रात्री अपघाती मृत्यू झाला.

हवालदाराचा अपघाती मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यातील हवालदाराचा शनिवारी (ता. 9) रात्री अपघाती मृत्यू झाला. सुधाकर बुवा (49) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या दुचाकीला नवी मुंबईतील बेलापूरजवळ टेम्पोने धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. टेम्पोचालक संतोषकुमार यादव (38) याच्याविरोधात सीबीडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. 

शनिवारी रात्री ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावून पनवेल येथे वास्तव्यास असलेले हवालदार सुधाकर दुचाकीवरून घरी परतत होते. सीबीडी बेलापूरच्या उड्डाणपुलालगत मेट्रोच्या पुलाजवळ एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात सुधाकर गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टेम्पोचालकाने त्यांना तत्काळ रुग्णालयातदेखील दाखल केले नाही. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवून टेम्पोचालक संतोषकुमारच्या विरोधात रविवारी (ता. 9) पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

हेही वाचा...दाऊदचा विश्वासू आणि कुख्यात गुंड तारीक परवीनला अटक

loading image
go to top