दाऊदचा विश्वासू आणि कुख्यात गुंड तारीक परवीनला अटक!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

कुख्यात गुंड दाऊद याचा विश्वासू तारीक परवीनला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली.

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद याचा विश्वासू तारीक परवीनला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली. परवीन व्यतिरिक्त गॅंगस्टर एजाज लकडावालाचा हस्तक सलीम फर्निचरवाला उर्फ महाराजलाही याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. 

हेही वाचा - ब्रेक अप नंतर बर्गर फ्री! वाचा काय आहे बातमी!

एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात रविवारी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आरोपींनी क्रॉफर्ड मार्केट येथील सुका मेवा विक्रेत्याकडे खंडणी मागितली होती. परवीनने तक्रारदाराकडून तीन लाख रुपये घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर डोंगरी परिसरातून परवीनला अटक करण्यात आली. सध्या मुंबईतील दाऊदचा व्यवहाराचे व्यवस्थापन परवीन करित असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे त्याची अटक महत्त्वपूर्ण असून त्याच्या अटकेमुळे डी कंपनीतील हालचालींची माहिती पोलिसांनी मिळू शकेल. असे, सह पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले. 2018 मध्ये परवीनला ठाणे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती.

महत्वाचं - धावत्या लोकलवर फेकली जातायेत कुत्र्याची पिले!

अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बिहार, पाटणा विमानतळावरून जानेवारीला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. यापकरणी त्याची चौकशी सुरु असताना त्याच्या मुलीला देखील खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच खंडणीच्या या प्रकरणात लकडावालासह महाराज ही सहभागी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tarek Parveen arrested in mumbai