मुंबईत पोलीस शिपायाला बॅटने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

प्रतीक्षा नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस शिपायाला काही गुंडांनी अडवून, त्यांच्यासोबत वाद घातला आणि त्यांना बॅटने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Mumbai Crime : मुंबईत पोलीस शिपायाला बॅटने मारहाण

मुंबई - मुंबईतील प्रतीक्षा नगर परिसरात राहणारे हरीश उरणकर हे वरळी पोलीस स्टेशन येथे नियुक्त पोलीस हवालदार आहेत. यांना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते राहत असलेल्या प्रतीक्षा नगर परिसरात राहणाऱ्या नित्यानंद यादव उर्फ नीतू व ईतर काही गुंडांनी त्यांना अडवून, त्यांच्यासोबत वाद घातला आणि यानंतर त्यांना बॅटने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

काही वर्षांपूर्वी यादव आणि उरणकर यांच्यामध्ये काही कारणाने वाद झाला होता. मात्र तो वाद पुन्हा यादव यांनी आपल्या काही साथीदारांमार्फत बाहेर काढत उरणकर यांना बुधवारी मारहाण केली. हरीश उरणकर हे वरळी पोलीस ठाण्यातून आपल्या घराकडे येत होते त्यावेळी सायंकाळी ही घटना घडली आहे.

या घटनेत हरीश उरणकर यांना हाताला आणि पाठीवर जखम झाल्या आहेत. या घटनेनंतर कुटुंबीय व स्थानिक येऊन वाद सोडवला, यानंतर लगेचच उरणकर यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात नेले होते. उपचारानंतर पोलिस हवालदार उरणकर आणि कुटुंबीय वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात गुंडाविरोधात तक्रार नोंदवली आहे.