
मागासवर्गीय असल्यानेच पोलिसांकडून छळ; राणांचे पोलिसांवर आरोप
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठन करणाचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अटकेनंतर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपण मागासवर्गीय (Scheduled Caste) असल्यामुळे आपल्याला तुरुंगात पाणी दिलं नसल्याचे म्हटलं आहे. याबाबत राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिरला यांना पत्र लिहिले आहे. माझ्या जातीवरून माझा पोलीस ठाण्यामध्ये छळ केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष बिरला यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. एवढेच नव्हेतर, खालच्या जातीची असल्याने आपल्याला बाथरूमचा वापरदेखील वापरू दिले नसल्याचा आरोपही राणा यांनी पोलिसांवर केला आहे. (Navneet Rana Write Letter To Lok Sabha Speaker)
दरम्यान, तुरुंगात नवनीत राणा यांना वाईट वागणूक दिली जात असल्याचे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. यावेळी राज्यात सध्या चालू असलेल्या एकूण परिस्थिवर भाष्य करत त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ध्वनिक्षेपकाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन झाले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा: भोंग्याबाबत केंद्रानं निर्णय घेतल्यास राज्यातही लागू करु - गृहमंत्री
सरकारशी बोलण्यापेक्षा भांडलेलेच बरे
दरम्यान, भोंग्यांबाबत चर्चा कऱण्यासाठी आज महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण दिले होते, मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेेल्या एकूण घटनांचा आलेख बघता, सरकारशी बोलण्याऐवजी भांडलेलेच बरे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाउड स्पीकरच बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित नव्हते यावरू राज्य सरकार याबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत असल्याचेही फडणवीस म्हणाले.
पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्याविरोधात एफआयर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकीत बसून फायदा काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री या बैठकीला नसतील तर आम्ही जाऊन काय करू, असं फडणवीस म्हणाले.
Web Title: Police Denied To Drink Water In Lockup Due To I Belong To Scheduled Caste Says Navneet Rana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..