Tue, March 21, 2023

मुंबईत पोलीस अमलदार म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.
Police Suicide : मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Published on : 4 March 2023, 3:53 pm
मुंबई - मुंबईत पोलीस अमलदार म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई गोविंद शांताराम चारोस्कर यांची सध्या विधान भवन सुरक्षा विभागात 23 फेब्रुवारी पासून अधिवेशन बंदोबस्त कामी नेमणूक करण्यात आली होती. 3 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता ड्युटी वरून घरी जात असताना नालासोपारा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म वरून येणाऱ्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत पोलीस अंमलदार शांताराम चारोस्कर यांच्या पँटच्या खिशातून सूसाइड नोट मिळाली आहे. सुसाइड नोटमध्ये आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.