नवी मुंबई : बिल्डर नलीन शहा व त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

police fir
police firsakal media

नवी मुंबई : चार वर्षांपूर्वी खारघर सेक्टर-२० मधील शाह किंग्डम या गृहप्रकल्पात सदनिका घेण्यासाठी ४० लाख रुपये दिले होते. मात्र अद्यापपर्यंत या इमारतीच्या बांधकामाला (building construction) सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकाने पैसे परत करण्याची मागणी केली होती. मात्र फ्लॅट बुकिंगची रक्कम (Flat booking amount) परत न दिल्याने वाशी पोलिसांत (Vashi police) तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार व्यावसायिक शाह ग्रुपचे व्यावसायिक नलीन शाह व त्यांच्या मुलाविरोधात फसवणुकीसह अपहाराचा (Fraud case) गुन्हा केला आहे. यापूर्वी या बांधकाम प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल आहे.

police fir
अनिल देखमुखांना सीबीआय कोठडी; चौकशीसाठी दिल्लीला नेणार?

माणगाव येथील व्यावसायिक हमजा अब्दुल्ला जलगावकर यांनी डिसेंबर २०१७ मध्ये शाह ग्रुप बिल्डर्सच्या खारघर सेक्टर-२० मधील शाह किंग्डम या इमारतीतील फ्लॅटची बुकिंग केली होती. त्यावेळी शाह व त्यांचा मुलगा नरविन शाह यांनी २०१९ मध्ये सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. त्यानुसार जलगावकर यांनी ४० लाख रुपये देऊन फ्लॅटची बुकिंग केली होती.

मात्र विकसक नलीन शाह यांनी सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण न केल्याने जलगावकर यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र त्यांनी अद्यापपर्यंत बांधकाम सुरू केले नाही. यासंदर्भात त्यांनी पोलिस उप आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर जलगावकर यांना १० लाख रुपये दिले. मात्र उर्वरित ३० लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे जलगावकर यांनी शाह पिता-पुत्राविरोधात वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाशी पोलिसांनी त्यांच्याविरोधात फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com