रायगड : जुन्या वादातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न; सहा जणांविरोधात गुन्हा | Raigad crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

रायगड : जुन्या वादातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न; सहा जणांविरोधात गुन्हा

खालापूर : दीड वर्षांपूर्वीचे जुने भांडण (old quarrel issue) उकरून एकाला बेदम मारहाण करण्याची घटना डोणवत गावच्या हद्दीत घडली आहे. याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात (Khalapur Police station) गुन्हा दाखल (Police fir filed) करण्यात आला आहे. जगदीश विलास आगिवले (वय २७, रा. नांवढै, खालापूर) हा शुक्रवारी रात्री गायत्री गारवा हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर रस्त्यावर आला असताना सागर पवार, विशाल चव्हाण, आशीष चव्हाण (तिघे रा. डोणवत), देवा राठोड, विशाल भगवान मोहिते आणि संतोष (तिघे रा. शिळफाटा, खोपोली) यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून त्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने डोक्यात जोरात फटका मारला.

हेही वाचा: उल्हासनगर : अकस्मात मृत्यूचे खुनात रूपांतर; दोघांवर गुन्हा, एकाला अटक

यानंतर जखमी जगदीशला हाताबुक्क्याने मारहाण मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सहा जणांविरोधात जगदीश यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी आशीष चव्हाण आणि विशाल मोहिते यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरारी असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. कराड हे करीत आहेत.

Web Title: Police Fir Filed Against Six Culprits In Attempt To Murder Case In Khalapur Raigad Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raigadcrime update
go to top