

AI Prank
ESakal
मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा गैरवापर सामाजिक शांतता कशी बिघडवू शकतो, याचा प्रत्यय अंधेरीतील लोखंडवाला परिसरात आला. एका सोसायटीतील मुलांनी गंमत म्हणून ‘एआय’च्या साहाय्याने तयार केलेला ‘अजगरा’चा फोटो व्हायरल केल्यामुळे पोलिस, अग्निशमन दल आणि प्राणीमित्रांची रात्रभर झोप उडाली. या प्रँकमुळे यंत्रणेची मोठी दमछाक झाली असून, संतापलेल्या प्राणीमित्र संघटनांनी आता या खोडसाळपणाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.