
आर्थर रोड कारागृहातील पोलीस हवालदार विवेक नाईक याला कारागृहातील कैद्यांना अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून 70 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपी हवालदाराविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे:
आर्थर रोड कारागृहाच्या चेकिंग गेटमधून पोलीस कॉन्स्टेबल नाईकला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याने चरसच्या कॅप्सूल पॅक करून आपल्या अंतर्वस्त्रात लपवल्या होत्या. त्याच्याकडून आठ कॅप्सूल जप्त करण्यात आले.
या कॅप्सूल राहुल नावाच्या कैद्याने आरोपी हवालदार नाईकला दिल्या होत्या. हे अमली पदार्थ नाईकला आरोपी रशीदकडे देण्यात येणार होते, परंतु त्याच वेळी कारागृह पोलिसांनी त्याला पकडले आणि अटक केली. त्यावेळी कॉन्स्टेबल नाईकने त्याची चौकशी करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला जखमी करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्य गेटवर त्याला पोलिसांनी पकडले.
दरम्यान, पोलीस हवालदार नाईक याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपी नाईक हा आर्थर रोड कारागृहातील एका कैद्याला अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे आता पोलीस अधिकारीच कारागृहात ड्रग्जची तस्करी करत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी काय कडक कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.