esakal | धक्कादायक! रक्षकच बनताय कोरोनाचे भक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! रक्षकच बनताय कोरोनाचे भक्षक

कस्तुरबा रुग्णालयात तैनात पोलिसाच्या घशात खवखव होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुदैवाने त्याला कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.

धक्कादायक! रक्षकच बनताय कोरोनाचे भक्षक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण जगासह देशांत कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला असून, सामान्य नागरीकांच्या सुरक्षेसाठी कस्तुरबा रुग्णालयात तैनात पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून कस्तुरबा रुग्णालयात तैनात पोलिसाच्या घशात खवखव होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुदैवाने त्याला कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.
मुंबईत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोनाची तपासणी तसेच रुग्ण दाखल आहेत. यामुळे याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.

मोठी बातमी - महाविद्यालयाची वसतिगृहे 'क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू

या बंदोबस्तात संबंधित पोलीस कर्मचारी देखील तैनात होते. अशातच त्यांच्या घशात खवखव होऊ लागल्याने त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. यावेळी अधिकाऱ्यांनी तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केली असता, या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा संशय असल्याने डॉक्टरांनी तत्काळ या कर्मचाऱ्याला दाखल करून घेतले आहे. तसेच युद्धपातळीवर त्याच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. त्यात तो निगेटीव्ह आला आहे. पण त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे

The police health questioned of Kasturba Hospital