esakal | जीवाची फरफट ! परप्रांतीय मजुरांसाठी बसचीही सुविधा, मात्र इतका खर्च काही परवडेना
sakal

बोलून बातमी शोधा

migrant

परराज्यातील स्थलांतरित मजूरांना खासगी बसनेही परतीचा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी समुहाने अर्ज करावा लागणार आहे; मात्र रेल्वेचा खर्चही न परवडणाऱ्या या मजुरांना बससेवेसाठी अधिक खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. 

जीवाची फरफट ! परप्रांतीय मजुरांसाठी बसचीही सुविधा, मात्र इतका खर्च काही परवडेना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : परराज्यातील स्थलांतरित मजूरांना खासगी बसनेही परतीचा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी समुहाने अर्ज करावा लागणार आहे; मात्र रेल्वेचा खर्चही न परवडणाऱ्या या मजुरांना बससेवेसाठी अधिक खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. 

मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

राजस्थानमधील 25 कामगार रविवारी बसने मुंबईतून रवाना झाले. नियमानुसार त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.  केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुचनांनूसार यासाठी पोलिसांची परवानगी, बसमध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. तसेच, बसचे निर्जंतूकीकरणही करावे लागणार आहे.

नक्की वाचाकोरोनावरील लस 'फास्टट्रॅक'मध्ये बनवा ! कोरोना लस निर्मितीत भारताची मजल कुठवर?

बस प्रवासात सर्वात मोठी अडचण खर्चाची आहे. परत येताना बस रिकामी आणावी लागणार आहे. त्यामुळे बसचा परतीचा खर्चही प्रवाशांकडूनच वसूल केला जाईल. त्याबरोबर क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी भरायचे असल्याने तो भारही याच प्रवाशांवर येणार आहे. त्यामुळे बसचे भाडे नेहमीपेक्षा दुप्पट, तिप्पट होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा विचार केल्यास साधारण सहा हजार रुपये प्रत्येक प्रवाशाला खर्च येऊ शकतो. मुंबईत साधारण दहा लाखांच्या आसपास स्थलांतरित कामगार आहेत. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान या भागातील कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. येथून कामगारांना पाठवताना संबंधित राज्याला माहिती द्यावी लागणार आहे. त्या राज्याने परवानगी दिल्यानंतरच कामगारांना पाठविता येणार आहे. 

हे ही वाचा : 'का' वाढतोय कोरोना रुग्णांचा आकडा? मुंबई पालिकेनं घेतला शोध... 

या आहेत अडचणी  

  • बसच्या प्रवासाला रेल्वेच्या तुलनेने जास्त वेळ लागणार. त्यामुळे खाण्या पिण्याचा प्रश्न. 
  • वाटेत नैसर्गिक विधीचीही अडचण होण्याची शक्यता. 
  • गॅरेज बंद असण्याची शक्यता असल्याने बसमध्ये बिघाड झाल्यास समस्या.

There is also a bus service for migrant workers, but the cost is double or triple