पोलीस भरतीचा पेपर फुटला नाही; मुंबई पोलिसांचा दावा

Police recruitment exam
Police recruitment exam
Updated on

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटल्याच्या (Police recruitment paper leak) चर्चा सगळीकडे सुरु आहेत, मात्र पेपर फुटला (Paper not leaked) नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी (Mumbai police claim) केलाय. काही दिवसांपूर्वी सैन्य भरतीचा पेपर फुटल्यामुळं ती परिक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील काही आरोपींना अटकही करण्यात (culprit was arrested) आली होती. मिलीटरी इंटेलिजन्सला मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती.

Police recruitment exam
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे महिला उद्योजकता धोरण जाहीर; वाचा सविस्तर

याच प्रकरणात लष्करातील एका हवालदारालाही अटक करण्यात आलीये. त्याची एक ऑडीओ टेप समोर आल्याची चर्चा होती, त्या ऑडीओ टेपमध्ये मुंबई पोलिसांच्या भरतीचा पेपरही लीक होणार असल्याची माहीती होती, असंही बोललं जातंय. पण या चर्चा मुंबई पोलिसांनी खोट्या असल्याचं सांगितलंय. कारण पोलिस भरतीचा पेपर लीक झाल्याची बातमी आल्यानंतर पेपर सेट करण्यात आला होता, त्यामुळ या माहीतीला काहीही अर्थ नसल्याचं सहआयुक्त प्रशासन, राजकुमार व्हटकर यांनी सांगितलं.

"आर्मी इंटेलिजन्स आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी पेपर लीक प्रकरणात 9 नोव्हेंबरला आर्मी हवालदार अनिल चव्हाण आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती आणि मुंबई पोलीस भरतीची लेखी परिक्षा 14 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या 10 ठिकाणी घेण्यात आली होती. आणि परिक्षेचा पेपर दोन दिवस आधी बनवण्यात आला होता. त्यातही पेपरचे 3 सेट बनवण्यात येतात, आणि कोणता सेट द्यायचा हे परिक्षेच्या आधीच्या दिवशी ठरतं, त्यामुळं पेपर फुटलाय या दाव्याला काहीही आधार नाही. - राजकुमार व्हटकर, सह आयुक्त प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com