महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे महिला उद्योजकता धोरण जाहीर; वाचा सविस्तर


Lalit Gandhi
Lalit Gandhisakal media

मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra chamber of commerce) , इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर (Industry and agriculture) तर्फे जागतिक महिला उद्योजकता दिनाचे (international women entrepreneurship day) औचित्य साधुन महाराष्ट्रासाठी महिला उद्योजकता धोरण जाहीर (Policy announced) करण्यात आल्याची माहीती चेंबर चे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी (Lalit gandhi) यांनी दिली. यानुसार महिला उद्योजकता वाढविण्यासाठी विशेष पावले उचलली जातील.


Lalit Gandhi
सरकारविरोधात आंदोलन; आमदार भातखळकर यांनी काढले बॅरीकेड

महाराष्ट्र चेंबर ही राज्यातील व्यापार, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था आहे. चेंबरच्या महिला उद्योजकता धोरणामध्ये खालील उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण महाराष्ट्र चेंबरतर्फे उपलब्ध करून दिले जाईल. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला उद्योजिकांसाठी उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी तसेच राज्य व केंद्र सरकारच्या योजना याविषयी माहीती देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र येत्या दोन वर्षात सुरू करण्यात येतील, असे गांधी म्हणाले.

त्याचप्रमाणे महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी सर्व सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र महिला उत्पादन क्लस्टर्स ची उभारणी केली जाईल. महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी संपुर्ण राज्यात विक्री व प्रदर्शन केंद्रे उभारली जातील. विविध बँकांबरोबर सहकार्य करार करून महिलांसाठी प्रकल्प उभारणी कर्ज, सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध करून दिले जाईल.


Lalit Gandhi
BMC चा मोठा निर्णय, ओमिक्रॉनमुळे शाळा सुरू होणार नाहीत!

महिला उत्पादन क्लस्टर्स व विक्री व एक्झीबिशन सेंटर्स निर्मितीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्‍चित केला आहे. सन 2022 मध्ये नाशिक, नागपुर, लातुर, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व 2023 मध्ये जळगांव, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली, अकोला, जालना या जिल्ह्यांमध्ये केंद्रांची सुरुवात केली जाईल. उर्वरीत सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 2027 या चेंबरच्या शताब्दी वर्षापर्यंत ही योजना पुर्ण करण्यात येईल, असेही गांधी यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबरच्या अंतर्गत राज्यस्तरीय महिला विभागाबरोबरच चेंबरच्या सहा विभागात विभागीय महिला समिती कार्यान्वित केल्या जातील. चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष श्रीमती शुभांगी तिरोडकर, करूणाकर शेट्टी व रविंद्र माणगावे यांच्या कोअर समितिच्या मार्गदर्शनाखाली महिला उद्योजकता धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com