
सिल्व्हर ओक आंदोलनात पोलिसांनी ४ एप्रिलला दिला होता इशारा; पत्रातून खुलासा
एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मात्र, हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचं बोललं जातंय. पोलिसांना यासंदर्भात कल्पना होती. तरीही पावलं उचलण्यात आली नाहीत, असे आरोपही होत आहेत. यासंदर्भात मोठा खुलासा झाला आहे.

शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
हेही वाचा: मोठी बातमी! सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांना चार एप्रिलला एक पत्र देण्यात आले होते. यामध्ये सिल्व्हर ओक, वर्षा, मातोश्री, परिवहन मंत्र्यांचा बंगला या ठिकाणी कर्मचारी आंदोलन करू शकतात, असं नमूद करण्यात आलं आहे. चार एप्रिलला मंत्रालय, तर पाच एप्रिलला सिल्व्हर ओक आणि मातोश्री बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता या पत्रात वर्तवण्यात आली आहे.
शरद पवांराच्या घरावरील आंदोलनाचा विषय समोर आल्यानंतर तत्काळ पोलीस उपायुक्त कुमार यांची बदली करण्यात आली. यानंतर एका एपीआयवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा खुलासा करणाऱ्या महत्वाच्या पत्राचा खुलासा झाला आहे.
Web Title: Police Revealed Letter Over St Workers Protest On Sharad Pawar Residence
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..