धक्कादायक ! भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

नागरिकांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक करुन ह्ल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. 13) सायंकाळच्या सुमारास घडली.

ठाणे : नागरिकांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक करुन ह्ल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. 13) सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात काही पोलिस जखमी झाले असून पोलिसांच्या दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी, गुरूवारी (ता.14) 40 ते 50 जणांवऱ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाची बातमी : '18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फेमस कॉलनी भागातील साईकिरण सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नासीर पटेल यांच्या घरातील मांजरीचा त्रास होत असल्याची तक्रार सोसायटीमध्ये राहणाऱ्या यास्मिन खानच्या भावाने पटेल कुटुंबीयांकडे केली होती. त्यावरून उदभवलेल्या वादात नासीर पटेल तसेच, त्याची मुले फहाद, फरहान, परेश, फराज व जरीना आणि आरीफ पतंगवाला यांनी लोखंडी रॉड, लाकडी बांबू आणि सळईने खान यांना मारहाण केली. यावेळी परेश याने मोबाईल हिसकावला तर, फहादने विनयभंग केल्याची तक्रार यास्मीन खान यांनी दाखल केली आहे.

हे ही वाचा : हृदयद्रावक ! ...आणि मुलांनी वाटेतच आपल्या बापाला गमावलं, वाचा मन सुन्न करणारी बातमी

दरम्यान, दोन्ही कुटुंबांतील भांडण सोडवण्यासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक बोरसे यांचे पथक घटनास्थळी पोहचले. तेव्हा, पोलिस शिपाई मयुर लोखंडे तसेच अन्य पोलिसांच्या दिशेने जमावाने दगडफेक केली. यात लोखंडे यांच्या पायाला मार लागला असून, पोलिस शिपाई परब यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी, लोखंडे यांच्या तक्रारीवरुन शादाब खान, हैदर खान, शोहेब खान, रमजान इदरिसी, हसिब शेख, नदीम कुरेशी, इब्राहिम खान, यासीन कुरेशी, अब्दूल छत्रीवाला, मोहम्मद तारीख जाफरानी, सुफीयान खान, काशिफ, सुफियान खान, आरीफ पतंगवाला याच्यांसह 40 ते 50 अनोळखी व्यक्तींविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात करीत आहेत.

Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck