crime
Esakal
शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी गावात दरोड्याचा थरार उघडकीस आला आहे. सुरतमधून व्यापाऱ्याची रोकड मुंबईला घेऊन जाणाऱ्या दोघांना मध्यरात्री रस्त्यात अडवून ६१ लाख ५० हजार रुपये लुटण्यात आले. यामध्ये दोघे पोलिसांच्या वेशात होते. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात आणखी सात ते आठ जणांचा समावेश असल्याने त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.