
ठाणे, ता. 24 : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आपल्या परीने प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱया वैद्यकीय, पोलिस, सफाई सेवेतील कर्मचाऱायंना सध्या योद्धाची उपमा दिली जात आहे. पण त्याचवेळी या योद्धांना त्यांच्याच इमारतीमध्ये राहणऱया रहिवाशांकडून त्रास सुरु झाला होता. त्यामूळे अत्यावश्यक सेवेतील कर्चमाऱयांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास संबधित सोसाटीमधील पदाधिकरयांना थेट पोलिस ठाणे गाठावे लागण्याची वेळ येणार आहे.
ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये.यासाठी पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळातील 1 हजार 463 गृहनिर्माण संस्था व गृहसंकुलांना स्थानिक पोलीस ठाण्याच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. कोरोनाच्या लढयात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या प्रामुख्याने डॉक्टर्स,नर्स, वैदयकिय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती,सफाई कर्मचारी,पोलीस व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना ते राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशी व पदाधिकाऱ्याकडुन मानसिक व शारीरीक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याची दखल थेट पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी घेतली आहे. अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलिस ठाण्यांना दिले आहेत.
पोलिस आयुक्तांच्या या आदेशानंतर परिमंडळ 1 मधील 152,परिमंडळ 2 मधील 155,परिमंडळ 3 मधील 906,परिमंडळ 4 मधील 85 आणि परिमंडळ 5 मधील 165 अशा एकुण 1 हजार 463 गृहसंकुलांना या संदर्भात पत्रव्यवहार करून नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये संबधित अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कामावरुन काही त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास संबधितांच्या विरोधात पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा ठाणे पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.
एकीकडे सोशल मिडियांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांचा उदोउदो करताना आपल्या सोसायटीमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱायंबाबत दुजाभाव करण्याचा प्रयत्न काही मोजक्या लोकांकडून सुरु आहे. गेल्या आठवडयात इलेक्ट्राॅनिक प्रसारमाध्यतील एका कॅमेरामनला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानुसार त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या कुटुंबियातील तब्बल दहा जणांना घोडबंदर रोड येथील विलगीकरण कक्षात नेऊन त्यांचीही तपासणी करण्यात आली. त्यांची तपासणी निगेटिव्ह आल्यानंतरही या सोसायटीमधील रहिवाशांसह परिसरातील नागरिकांनी या कुटुंबाला तत्काळ सोसायटीत येण्यास विरोध केला होता. एवढेच नव्हे तर एका लोकप्रतिनिधीवर दबाव आणून या कुटुंबांची सलग दुसऱया दिवशी पुन्हा चाचणी करण्यास भाग पाडण्यात आले. पण ही चाचणी देखील निगेटिव्ह आल्याने त्यांना अखेर आपल्या घरी जाता आले आहे. काही सोसायटीमध्ये वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱयांना त्यानी वारंवार सोसायटीत येजा करु नये अशी बंधने घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर काही पोलिसांनाही दररोज इमारतीमध्ये न येण्याचा सल्ला दिला जात आहे. आज कोरोनाची भीत सर्वांच्या मनात आहे. पण अशावेळी आपल्या कुटुंबाला सोडून आपल्या अत्यावश्यक कर्तव्यासाठी घराबाहेर पडणऱया कर्मचाऱयांना असा अनुभव येत असल्याने ती चिंतेची बाब ठरली आहे.
समाजाने भीतीवर मात करावी - डॉ. अद्वैत पाध्ये, मानसोपचारतज्ञ
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलिस, पत्रकार यांना आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्रास देत असल्याचे वृत्त कानी येते. केंद्र सरकारने याविरोधात पावले उचलत कायदा करीत असे करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने त्यांना संरक्षण मिळाले आहे. कोरोनाविषयी मिळत असलेली माहिती, मग ते विलगीकरण आणि बाकी साऱ्या गोष्टींमुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून त्या भितीतूनच अशी वागणूक अत्यावश्यक सेवेकऱ्यांना दिली जाते. लोकांनी या सर्व परिस्थितीचा नीट अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे असे जरी दिसले तरी यातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आपल्या देशात जास्त आहे. आजारातून बरे होण्यास वेळ लागत असल्याने बाधितांच्या प्रमाणापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या कमी असली तरी त्यामानाने लक्षणीय आहे असे म्हणता येईल. हे रुग्ण बरे होणाऱ्यांच्या मागे आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलिस, स्वच्छतादूत यासर्वांचाच हातभार आहे. हे आरोग्य सैनिक असून त्यांना युद्धात जिंकण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असून आपल्या सामाजिक बांधिलकीतून, वागणीकूतून ते व्यक्त होईल. सारासार विचार केला तर हा आजार योग्य काळजी घेतल्यास बरा होणारा आजार आहे. अती काळजीतून भिती जन्माला येते, आणि योग्य काळजी घेतली तर भिती नष्ट होऊन मातही करता येते प्रत्येक गोष्टीवर हीच मानसिकता प्रत्येकाने ठेवावी.
फ्रंटलाईनवरील समाज सैनिकांना सलाम केला पाहिजे - महापालिका उपायुक्त संदीप माळवी
फ्रंट लाईनवर काम करणारयांना जर अटकाव केला तर भविष्य अधिक वाईट होईल. फ्रेटलाईनवरील या प्रत्येक सैनिकाला खरे आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीत या लोकांना अटकाव करता येत नाही. मूळात याचे ज्ञान काही लोकांना नसल्याने त्यांच्याकडून असे प्रकार घडत आहेत. प्रत्येक ठिकाण कायद्याची भाषा करणऱया सुशिक्षित वर्गाने या सैनिकांचा सहानुभूतीने विचार केला पाहिजे. आजच्या घडीला आपल्या कुटुंबियांपासून जीवावर उदार होऊन समाजाचे काम करण्यासाठी ही लोक बाहेर पडत असतात. जर त्यांना मानसिक स्वास्थ मिळाले नाही तर समाजावर आलेल्या आपत्तीवर आपण नियंत्रण कसे मिळविणार याचा विचार केला पाहिजे.
police sends notices to 63 societies for not behaving properly with covid yoddhas
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.