रिलायन्सने बनवले चीनपेक्षा स्वस्त पीपीई किट किंमत आहे फक्त 'इतकी'...

रिलायन्सने बनवले चीनपेक्षा स्वस्त पीपीई किट किंमत आहे फक्त 'इतकी'...

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा एक भाग म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीने चीनी बनवाटीच्या पीपीई किट पेक्षा अत्यंत स्वस्त व दर्जेदार पीपीई किट बनवले असून रोज एक लाख किट ची निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

रिलयान्सच्या रिफायनरीमध्ये पीपीईसाठी लागणाऱ्या कपड्याचे (फॅब्रिक) मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु झाले आहे. रिलायन्सने नुकत्याच विकत घेतलेल्या आलोक इंडस्ट्रीज मध्ये दहा हजार कामगार या फॅब्रिक पासून पीपीई किट बनवीत आहेत. हे किट चिनी किटपेक्षा एक तृतियांश स्वस्त पण जास्त दर्जेदार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

रोज अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक लाख किट बनवली जातील. डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी आदींना रुग्णांची तपासणी करताना संसर्ग न होण्यासाठी या किटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. चिनी बनावटीचे पीपीई किट दोन हजार रुपयांचे असते, तर रिलायन्सचे हे किट फक्त साडेसहाशे रुपयांचे आहे. 

त्याखेरीज रिलायन्सतर्फे स्वदेशी तंत्रज्ञानाचे कोरोना टेस्टिंग किटही तयार करण्यात आले आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या सहकार्याने हे आरटी-एलएएमपी चाचणी किट तयार करण्यात आले आहे. या किटमधून एका तासात चाचणीचा निकाल कळत असून ते वापरण्यासही अत्यंत सोपे आहे. त्यामुळे मोबाईल चाचणी वाहनातही त्याद्वारे चाचणी घेता येईल. याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने कोरोनाला पराभूत करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. 

यापूर्वीदेखील रिलायन्स ने स्वॅब चा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारे टेस्टिंग स्वॅब विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पूर्वी हे किट चीनमधून प्रत्येकी 17 रुपयांना आयात केले जात होते, आता रिलायन्स व जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या सहकार्याने हे किट केवळ दोन रुपयांत तयार होते. 

Reliance made cheaper PPE kits and covid 19 kits than china

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com