Naxal Encounter : मिलिंद तेलतुंबडेवरील ५० लाखाचं बक्षीस पोलिसांना मिळणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath-shinde

मिलिंद तेलतुंबडेवरील ५० लाखाचं बक्षीस पोलिसांना मिळणार?

ठाणे - गडचिरोली येथे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २६ जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये सेंट्रल कमिटीचा सदस्य आणि जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश असून त्याचं एन्काऊंटर ही अलीकाळच्या काळातली मोठी कारवाई असल्याचा दावा नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर तेलतुंबडेवरील ५० लाखांचं बक्षीस चकमकीत सहभागी असलेल्या पोलिसांना मिळणार असल्याचं सुतोवाचही शिंदे यांनी यावेळी केलं.

हेही वाचा: गडचिरोली - २६ नक्षलवाद्यांची नावे आली समोर; लाखोचं होतं बक्षीस

शिंदे म्हणाले, "गडचिरोली येथे शनिवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले होते. यामध्ये जहाल नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचाही समावेश असल्याचं नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषद स्पष्ट केलं. ही चकमक ९ ते १० तास सुरु होती. गस्तीवर असताना समोरून गोळीबार झाला त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्तुउत्तर दिलं. शनिवारी झालेली चकमक ही नक्षलवाद चळवलीला मोठा धक्का असून मिलिंद तेलतुंबडेची माहिती देणाऱ्यास असलेलं ५० लाखाचं बक्षीस या चकमकीत सामील असलेल्या पोलिसांना देण्यात यावं, याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत"

पोलिसांना अलर्ट

नक्षलींचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षवादी ठार झाल्यानं नक्षलवादयाकडून त्याचं प्रतित्तुर देण्याची शक्यता असल्याने पोलीसही अलर्ट आहेत. गडचिरोलीचा विकास हेच आमचे लक्ष्य असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, या कारवाईत पोलिसांचे चार जवानही जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आत्मसमर्पण करा

नक्षलवाद्यांना बंदुकीच्या जोरावर सत्ता मिळवायची आहे. पण लोकशाहीत हे शक्य नाही असं ठणकावत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावं, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहत आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्यांना कायमस्वरूपी रोजगार देऊन उदरनिर्वाहाची समस्या सोडविण्यासाठी भर दिला जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

loading image
go to top