राजकारणाचा भिवंडी पॅटर्न; नगरसेवक चार, पण बसवला आपला महापौर..  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

मुंबईच्या नजीक असलेल्या भिवंडीमध्ये राजकारणाचा एक नवीन पॅटर्न पाहायला मिळाला. भिवंडीच्या महापौरपदी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत

मुंबईच्या नजीक असलेल्या भिवंडीमध्ये राजकारणाचा एक नवीन पॅटर्न पाहायला मिळाला. भिवंडीच्या महापौरपदी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. बंडखोर नगरसेवकांमुळे कॉंग्रेसकडे आलेल्या एकहाती सत्तेचे तीनतेरा वाजलेत. महापौर निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 18 नगरसेवक फुटल्याने  कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाची राजकीय बातमी :  भाजपातील डझनभर आमदार फुटीवर आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य

 

भिवंडी महापालिकेतील पक्षीय बलाबल

  • काँग्रेस – 47

  • शिवसेना – 12

  • भाजप – 20

  • कोणार्क विकास आघाडी – 4

  • समाजवादी पार्टी – 2

  • आरपीआय (एकतावादी)- 4

  • अपक्ष – 1

 

त्यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. बहुमतानं निवडून येणारे विरोधात आणि अल्पमतातले सत्तेत असंही इथं होतं. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग असाच होता  आणि आता असाच काहीचा प्रकार भिवंडीतही घडलाय.

हेही वाचा :  अखेर नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित..
 

भिवंडीत अवघ्या 4 नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीला महापौरपद मिळालंय. विशेष म्हणजे स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेसचा पालिकेत पराभव झालाय. प्रतिभा पाटिल यांना एकूण 49 मतं मिळाली तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या रिषिका राका यांना 41 मतं मिळाली. काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्यानं भिवंडीमध्ये ही उलथापालथ झालीये.  कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील महापौर झाल्या आहेत.

भिवंडी महापालिकेत आधी काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर तर सेनेचे मनोज काटेकर उपमहापौर होते. मात्र इथलं महापौरपद खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालं आणि इथंच घोडाबाजाराला सुरुवात झाली. 

Web Title : political earthquake in bhiwandi this is bhiwandi pattern of politics


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political earthquake in bhiwandi this is bhiwandi pattern of politics