ठाकरे स्मारकावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक; मुंबईत राजकीय घडामोडीना वेग...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

एकीकडे कोरोनाचा वाढता आकडा आणि दुरीकडे महाराष्ट्रात रंगलेलं राजकारण. दोन्ही बाबींमुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघतंय

मुंबई - एकीकडे कोरोनाचा वाढता आकडा आणि दुरीकडे महाराष्ट्रात रंगलेलं राजकारण. दोन्ही बाबींमुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघतंय. आज सकाळी शिवसेनेचे नेते, राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या. संजय राऊतांनी त्यांची आणि राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलंय. यानंतर लगेचच आणखी एक मोठी राजकीय घडामोड मुंबईमध्ये घडली. 

एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा सामना तर दुरीकडे राजकीय आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळतायत. संजय राऊत यांच्या राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे स्मारकात आणखीन एक महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी  काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.

मोठी बातमी मृत रुग्णाच्या शरीरातील कोरोनाचं होतं काय ? कोरोना शरीरात फोफावतो की मरतो?

ठाकरे स्मारकावर पार पडलेल्या बैठकीत जयंत पाटील आणि अजोय मेहता हे देखील उपस्थित होते. यामध्ये मुख्यत्त्वे राज्याचं अर्थचक्र कशा पद्धतीनं पुन्हा रुळावर आणायचं, केंद्राकडून महाराष्ट्रासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करण्यासाठी केंद्राशी कसं बोलणं केलं पाहिजे, ३१ तारखेनंतर रेडझोनमध्ये कोरोना कशाप्रकारे उपाययोजना केल्या जाव्यात याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. या बैठकीत कोरोना संदर्भातील उपाय योजना यासोबतच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे.

political happenings taking pace in mumbai sharad pawar and cm uddhav thackeray met at thackeray samarak 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political happenings taking pace in mumbai sharad pawar and cm uddhav thackeray met at thackeray samarak