मुख्यमंत्र्यांनी संपत्ती दडवली; किरीट सोमय्यांची आयकर विभागाकडे तक्रार 

मुख्यमंत्र्यांनी संपत्ती दडवली; किरीट सोमय्यांची आयकर विभागाकडे तक्रार 

मुंबई  - विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत अर्धवट माहिती दिली असून, त्यांनी कोरलई गावातील साडेदहा कोटी रुपयांची आपल्या मालमत्तेची माहिती दडवली आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयकर विभागाकडील तक्रारीत केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती आणि त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी केली असता वरील बाब दिसून येते, असे सोमय्या यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे. 

सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या दडवलेल्या संपत्तीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आज त्यांनी आयकर खात्याकडे तक्रार केली आहे. इन्व्हेस्टिगेशन विंगच्या महासंचालक भानुमती यांच्याकडे याबाबत चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे खरेदीमूल्य चार कोटी 37 लाख रुपये दाखवले आहे, तर त्या संपत्तीच्या करारामध्ये त्याचे बाजारमूल्य चार कोटी 14 लाख रुपये आहे व खरेदीमूल्य दोन कोटी 10 लाख रुपये आहे. अशा प्रकारे ही माहिती परस्पर विसंगत असल्याचे दिसून येते. 

कोरलाई गावातील 23 हजार 500 चौरस फूट बांधकामांच्या 19 बंगल्यांची माहितीही प्रतिज्ञापत्रात नाही. 787 ते 805 क्रमांकाची ही घरे अन्वय नाईक यांच्या नावावर होती, नंतर ती रश्‍मी उद्धव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावावर केली, असा सोमय्या यांचा दावा आहे. त्याबाबत ग्रामसभेत झालेल्या कार्यवाहीच्या नोंदींचे दाखलेही सोमय्या यांनी तक्रारीसोबत दिले आहेत. या दोघींनी या घरांचा 2013 ते 2021 अशा आठ वर्षांचा मालमत्ता करही नोव्हेंबर महिन्यात आरटीजीएसने भरला. ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार या एकूण संपत्तीचे बाजारमूल्य पाच कोटी 29 लाख रुपये आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोरलाई-अलिबाग येथे साडेदहा कोटी रुपयांची जमीन व मालमत्ता आहे; पण या संपत्तीची किंमत व मूल्य जेमतेम दोन कोटी रुपये एवढीच दाखवली आहे, असेही सोमय्या यांचे म्हणणे आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

political marathi news uddhav thackeray hides wealth Kirit Somaiya bjp politics latest

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com