esakal | महाविकास आघाडी म्हणजे गेंड्याच्या कातडीचे सरकार; भाजपची जळजळीत टीका
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडी म्हणजे गेंड्याच्या कातडीचे सरकार; भाजपची जळजळीत टीका

महाविकास आघाडी सरकार संवेदनाहीन असून ते गेंड्याच्या कातडीचे आहे, अशी जळजळीत टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली.

महाविकास आघाडी म्हणजे गेंड्याच्या कातडीचे सरकार; भाजपची जळजळीत टीका

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई - शिक्षकांच्या मागण्यांबाबत उदासीन असलेले महाविकास आघाडी सरकार संवेदनाहीन असून ते गेंड्याच्या कातडीचे आहे, अशी जळजळीत टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली. मुंबईतील आझाद मैदानात किमान वेतनाच्या मागणीसाठी सलग चार दिवस संगणक परिचालक बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत. आज दरेकर यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

फडणवीस सरकार कुठल्याही आंदोलनाची तातडीने दखल घेऊन मार्ग काढत असे. मात्र या सरकारकडे तेवढी तत्परता नाही. संगणक परिचालकांना कायम करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले पाहिजे.  खरेतर हे सरकार झोपेचे सोंग घेणारे आहे, झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही. आता या सरकारला गदागदा हलवल्याशिवाय किंवा टोकाची भुमिका घेतल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही, अशी टिका दरेकर यांनी केली.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी शिक्षकांचे प्रश्न मांडून या सरकारला जागे करणार आहे. सरकारवर दबाव आणून सरकारला भूमिका घेण्यास भाग पडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दरेकर यांनी दिला. या सरकारकडे मुंबईतील बिल्डरांना सवलती देण्यासाठी तसेच दारू विक्री परवाना फी रद्द करण्यासाठी वेळ व पैसा आहे. पण शिक्षकांसाठी तीनशे कोटी रुपये देण्यासाठी सरकार आर्थिक अडचणींचे कारण पुढे करीत आहे.  जनतेसाठी काही करण्याची इच्छाशक्तिच या सरकारकडे नाही, असेही ते म्हणाले.

-----------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

political marathi news updates pravin darekar criticism Mahavikas Aghadi government on teachers politics live