सरकारविरोधात आंदोलन; आमदार भातखळकर यांनी काढले बॅरीकेड

Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkarsakal media
Updated on

मुंबई : मालाडच्या (पू.) पादचारी पुलाचे काम रद्द ( Pedestrian pool work cancelation) झाल्याचे प्रशासनाने जाहीर करूनही त्यासाठी लावलेले बॅरीकेड (Barricade removed) तसेच रस्त्यावर ठेवल्याने लोकांना होणारी अडचण दूर करण्यासाठी भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आज आंदोलन (strike) करून ते बॅरिकेड काढून टाकले.

Atul Bhatkhalkar
BMC चा मोठा निर्णय, ओमिक्रॉनमुळे शाळा सुरू होणार नाहीत!

मालाड पूर्व येथील जनतेच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेले पादचारी पुलाचे काम स्थानिकांच्या विरोधानंतर स्थगित करण्यात आले. त्यानंतर तीन महिने उलटुन गेल्यानंतरही पुलाच्या कामाकरिता उभारलेले बॅरिकेड्स हटवण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत होते. रस्ता अरुंद करणारे हे बॅरीकेड काढले नाहीत, तर आम्ही आंदोलन करून ते काढून टाकू, असा इशारा भातखळकर यांनी यापूर्वी दिला होता. तरीही प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे आज भातखळकर यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन काही बॅरीकेड काढून टाकले.

मालाड पूर्वेकडील दफ्तरी रोड आकाराने लहान असल्यामुळे आप्पापाडा, कुरार गाव, तानाजी नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मालाड येथे जाणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे भातखळकर यांनी प्रशासनाकडून हा पादचारी पूल मंजूर करून घेतला. परंतु नंतर स्थानिक रहिवासी व व्यापारी यांचा विरोध लक्षात घेत हा पादचारी पूल रद्द करण्याचे ठरविण्यात आले. पालकमंत्री आदित्य ठाकरे तसेच मंत्री अस्लम शेख यांनी तसे घोषित केले. मात्र कंत्राटदाराशी झालेल्या ‘अर्थपूर्ण संवादामुळे‘ तसे कोणतेही कायदेशीर किंवा कार्यालयीन आदेश दिले नाही, असा दावा भातखळकर यांनी यासंदर्भात केला आहे.

अगोदरच आकाराने लहान असलेल्या दफ्तरी रोडवर उभारण्यात आलेल्या बॅरिकेडमुळे तेथे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आज हे पाऊच उचलण्यात आले आहे. पुढील आठ दिवसांत या रस्त्यावरील सर्व बॅरिकेड, यंत्रसामुग्री, सामान, राडारोडा आदी महानगरपालिकेने हटविले नाही तर जनतेच्या सोयीकरिता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते सर्व बॅरिकेड व साहित्य हटवतील असा इशाराही भातखळकर यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com