राज्याचे मुख्यमंत्री मिस्टर सत्यवादी आहेत, पूजा चव्हाणच्या कुटूंबियांना न्याय मिळेल; शिवसेना नेत्याची प्रतिक्रीया

राज्याचे मुख्यमंत्री मिस्टर सत्यवादी आहेत, पूजा चव्हाणच्या कुटूंबियांना न्याय मिळेल; शिवसेना नेत्याची प्रतिक्रीया

मुंबई : राज्याचे मुख्यंमत्री हे संवेदशील आहेत.ते मिस्टर सत्यवादी आहेत.त्यामुळे पुजा चव्हाण आणि त्यांच्या कुटूंबियांना न्याय मिळेल.असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी नमुद केले. पूजा चव्हाण प्रकरणात तपास सुरु आहे.मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदशनील मनाचे आहेत.ते काही डोळे झाकून बसलेले नाहीत.मुख्यमंत्री हे कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत.त्यांचे राज्यातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष असते.या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाण तीच्या कुटूंबियांना न्याय मिळणार असे राऊत यांनी नमुद केले.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदी असते तर त्यांनी संजय राठोड यांना फाडून खाल्ले असते.असे विधान वाघ यांनी केले आहे.त्याबद्दल संजय राऊत म्हणाले,‘चित्रा वाघ या विरोधी पक्षात आहेत.त्यामुळे त्या आंदोलन करत राहाणार.त्यांच्याकडे या प्रकरणाची अतिरीक्त माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणांना द्यावी.आंदोलन करु नये ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे.महाराष्ट्राची परंपरा ही सत्यासाठी,न्यायासाठी लढणारी आहे.त्यामुळे हा प्रश्‍न चर्चेतून सोडवात येईल.या प्रकरणी विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रश्‍न विचारावेत असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केल्या बद्दल राऊत म्हणाले,‘आपल्याकडे काही माहिती नाही.या प्रकरणी राज्याच्या गृहमंत्रयांकडे अधिक माहिती असेल.

---------------------------------

political updates The Chief Minister udhav thackaray Pooja Chavans family will get justice sanjay raut politics live update 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com