लोकांना उपदेश देण्यापेक्षा स्वपक्षीयांना कोरोनाचे नियम शिकवावेत; मुख्यमंत्र्यांकडे भाजपची मागणी

लोकांना उपदेश देण्यापेक्षा स्वपक्षीयांना कोरोनाचे नियम शिकवावेत; मुख्यमंत्र्यांकडे भाजपची मागणी

मुंबई - मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील संजय राठोड, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी नेत्यांना कोरोना प्रतिबंधाचे नियम शिकवावेत, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

कोरोना योध्यांचे लसीकरण शिल्लक असताना बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे. हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे. यातून शिवसेनेची स्वार्थी मानसिकता दिसते, अशी घणाघाती टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी संपूर्ण राज्याला उपदेशाचे डोस पाजल्याच्या दुसऱ्याच दिवशी  वनमंत्री संजय राठोड यांनी दहा हजारांपेक्षा जास्त लोक जमवून कोरोनाला खुले निमंत्रण दिले. तर दुसरीकडे कोरोना योद्धयांचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नसताना, तसेच वरिष्ठ नागरिक, बालक यांना अगोदर लस देण्याची आवश्यकता असताना सुद्धा ठाण्यात शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःचे लसीकरण करून घेतले आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असूनसुद्धा कोरोनाविरोधातील लसीकरण कार्यक्रमात महाराष्ट्र मागे का आहे हेच यातून स्पष्ट होते. यातही धक्कादायक बाब म्हणजे ज्या पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी निर्लज्जपणे शक्तीप्रदर्शन केले त्या पोहरादेवीच्या महतांनाच आता कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना कोरोनाचे नियम शिकवावे असा टोलाही भातखळकर यांनी लगावला.

कायम दातखिळी बसल्यासारखे गप्प बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याविषयी त्यांचे काय मत आहे याचा सुद्धा खुलासा करावा अशीही मागणी भातखळकर यांनी केली आहे. राठोड, म्हस्के, फाटक आदींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा भारतीय जनता पक्ष आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे

-----------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

politics marathi news Cm uddhav thackray teach the rules of corona his supporters atul bhatakhalkar political news updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com