Mumbai Pollution: मुंबईतील प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर

मिलिंद तांबे
Sunday, 24 January 2021

मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.

मुंबई: मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. मुंबई शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 320 नोंदवला  गेला आहे. त्यामुळे श्वासनासंबंधी समस्याच असणाऱ्यांनी काळजी घेणे महत्वाचे आहे.

मुंबईतील गारव्यात ही वाढ झाली असून त्यासह प्रदूषणाची पातळी ही वाढली आहे. मुंबईतील सर्वाधिक प्रदूषिण मालाड परिसरात असून हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट 353 नोंदवला गेला आहे. तर भांडूप आणि वरळीमध्ये मध्यम स्वरूपाच्या प्रदूषणाची नोंद झाली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 162 आणि 190 नोंदवण्यात आला आहे. 

भांडूप आणि वरळी विभाग वगळता मुंबईतील इतर विभागात ही हवेची पातळी अतिशय वाईट नोंदवण्यात आली आहे. त्यात कुलाबा 331,अंधेरी 330, माझगाव 314, बोरिवली 303, बीकेसी 318,चेंबूर 329 विभागांचा समावेश आहे. तर नवी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत ही वाढ झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 372 सह अतिशय वाईट नोंदवला गेला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईतील हे वाढलेले प्रदूषण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. यामुळे आरोग्याच्या समस्याच वाढण्याचा धोका आहे. श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तीसाठी हे वातावरण धोकादायक असून त्यांनी विशेष काळजी घेण्याची आवाहन सफर कडून करण्यात आले आहे. शक्यतो पहाटे दाट धुके असताना प्रभात फेरीसाठी बाहेर न पडता कोवळ्या उन्हात लोकांनी बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हेही वाचा- Corona Vaccination: सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस होणार लसीकरण

मुंबईतील वातावरण कोरडे आहे. थंडीचा जोर वाढला आहे. हवेचा वेग ही मंदावला आहे. त्यात मुंबईच्या सीमारेषेवर धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धूलीकण जमिनीलगत राहत असल्याने प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसते.
डॉ गुफ्रान बेग, प्रकल्प संचालक, सफर

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Pollution levels Mumbai risen and air quality reached dangerous levels


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution levels Mumbai risen and air quality reached dangerous levels