
ठाणे, मुंबईची हवा दिल्ली प्रमाणे प्रदूषित होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सतर्क झाले आहे. हवेमधील प्रदूषणाचे प्रमाण ओळखून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई, ठाणे, वसई - निजामपूर आणि मीरा भाईंदर महानगर पालिकांच्या हद्दीत निरंतर हवा तपासणी यंत्र बसवले आहेत.
या यंत्रामार्फत 24 तास हवेच्या गुणवत्तेवर नजर ठेवली जाऊन त्याबाबताचे रिपोर्ट तात्काळ उपलब्ध होणार असल्याने त्यावर वेळीच उपाय योजना करणे शक्य होईल. ठाणे, मुंबईत थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने या शहरांना हवेतील प्रदूषणाचा धोका वाढला आहे.