esakal | संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला, विदर्भातले शिवसैनिक एकवटणार

बोलून बातमी शोधा

संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला, विदर्भातले शिवसैनिक एकवटणार}

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकीयांचाच दबाव वाढणार असंच दिसत आहे. राठोडांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातले शिवसैनिक एकवटणार असल्याचं समजतंय.  

संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला, विदर्भातले शिवसैनिक एकवटणार
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड अधिवेशानच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकीयांचाच दबाव वाढणार असंच दिसत आहे. राठोडांच्या राजीनाम्यासाठी विदर्भातले शिवसैनिक एकवटणार असल्याचं समजतंय.  

विदर्भातले शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे.   संजय राठोडांमुळे पक्षाचं काम करणं कठिण जात असल्याची खंत विदर्भातले शिवसेनेचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. 

भाजपच्या दबावासोबत शिवसेनेच्या आमदार खासदारांचाही पक्षावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही म्हटलं  जात आहे. १ मार्चपासून अधिवेशन सुरु होत आहे. राठोड यांच्यामुळे अधिवेशनात गदारोळ होणार हे निश्चित आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंत्रिमंडळ स्थापनेवेळीही काही खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी राठोड यांच्या मंत्रीपदाला विरोध केला होता. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा राठोड यांच्या विरोधात पत्र देण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राठोड यांची कानउघडणी करण्यात आली आहे. मी निर्णय घेण्याआधी तू घे, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावल्याचं समजतंय. 

संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी होत आहे. विरोधकही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा नाराज असल्याचं बोललं जात आहे. 

हेही वाचा-  Mukesh Ambani: स्फोटकासोबत सापडलेल्या बनावट नंबरप्लेटबाबत धक्कादायक माहिती उघड

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपही संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन आक्रमक झाली आहे. त्यामुळे संजय राठोड हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे. 

संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याची भूमिका भाजपनं घेतली आहे. संजय राठोड  यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार असं बोललं जात आहे, मग हे सरकार कसली वाट पाहतय. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देणारं हे सरकार आहे. संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नसल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

Pooja Chavan Case Pressure Chief Minister for Sanjay Rathod resignation