गोरगरिबांसाठी नगरसेविका बनल्या भाजी विक्रेत्या!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासत आहे. अशा काळात नागरिकांना चढ्या भावात भाजीपाला घेण्याची वेळ येऊ नये, म्हणून स्वत: नगरसेविकाच भाजीविक्रेत्या बनल्या आहेत.

ठाणे : लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासत आहे. अशा काळात नागरिकांना चढ्या भावात भाजीपाला घेण्याची वेळ येऊ नये, म्हणून स्वत: नगरसेविकाच भाजीविक्रेत्या बनल्या आहेत.

ही बातमी वाचली का? सरकारकडून मासेमारीला परवानगी; मात्र, मासे विकणार कुठे?

कोरोनाला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुरबाड शहर लॉकडाऊन मध्ये असल्याने काही व्यापाऱ्यांनी चड्या भावात भाजीपाला व दुध विकण्यास सुरुवात केली होती. यांचा फटका सर्वसाधारण ग्रामस्थांना बसू लागल्याने अनेक तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे मुरबाड नगरपंचायतीच्या नगरसेविका साक्षी चौधरी यांनी आपल्या पतीच्या मदतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर भाजीपाला व दुध विक्री सुरु केली आहे. ग्राहकांसाठी कांदे 18 रूपये किलो, टोमॅटो 7 रूपये किलो, वांगी 10 रूपये किलो, दुध 50 रूपये लिटर आणि द्राक्षे 100 रूपयात 3 किलो अशा माफक दरात विक्री सुरू केल्याने मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

ही बातमी वाचली का? लॉकडाऊनमुळे मिरचीला कोरोनाचा ठसका

लोकप्रतिनीधी असल्याने जनतेसाठी संकटात धावून जाणे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी स्वत: भाजीपाला माफक दरात विक्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला माझे पती संतोष चौधरी यांनी पाठबळ दिल्याने हे शक्य झाले.
साक्षी चौधरी, नगरसेविका, मुरबाड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for the poor persons Vegetable corporator become vendor

टॅग्स
टॉपिकस