लॉकडाऊनमुळे मिरचीला कोरोनाचा ठसका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

उन्हाळा आला की महिलांना वेध लागतात ते वर्षभरासाठी मसाला बनवून ठेवण्याचे. लाल मिरचीसाठी कर्जतची बाजारपेठ प्रसिद्ध असून येथे डोंबिवली, ठाणे, मोहपाडा, रसायनी आदी शहरांतून खरेदीसाठी मोठ्या संख्येने ग्राहक येतात. त्यामुळे कर्जतचा तिखट मिरचीचा बाजार गरम असतो; मात्र लॉकडाऊनमुळे कर्जतच्या मिरचीला कोरोनाचा ठसका लागल्याचे दिसून येत आहे. 

रायगड : उन्हाळा आला की महिलांना वेध लागतात ते वर्षभरासाठी मसाला बनवून ठेवण्याचे. लाल मिरचीसाठी कर्जतची बाजारपेठ प्रसिद्ध असून येथे डोंबिवली, ठाणे, मोहपाडा, रसायनी आदी शहरांतून खरेदीसाठी मोठ्या संख्येने ग्राहक येतात. त्यामुळे कर्जतचा तिखट मिरचीचा बाजार गरम असतो; मात्र लॉकडाऊनमुळे कर्जतच्या मिरचीला कोरोनाचा ठसका लागल्याचे दिसून येत आहे. 

ही बातमी वाचली का? पंचतारांकित ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये कोरोनाचा शिरकाव 

पुणे, ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यातील चवदार आणि चविष्ट खाणारे खवय्ये यांच्यासाठी कर्जतच्या बाजारातील मिरचीला महत्त्व आहे. त्यात हैद्राबाद गंटूरवरून येणारी मिरची यावर्षी जास्त भाव खात आहे. त्यामुळे मिरचीची घाऊक व्यवसाय करणारे संकटात सापडले आहेत. कर्जत मिरची बाजारात लवंगी, संकेश्वरी, बेडगी, काश्‍मिरी, टोमॅटो, तेलपट्टी, अंकुर, बोर, गंटूर आदी जातींच्या मिरच्या विक्रीस असतात. जर लॉकडाऊन उठले नाही, तर मिरची पडून राहील आणि लाखोंचे नुकसान होईल, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ही बातमी वाचली का? एक हजार जणांना क्वारंटाईन केलं; कुटुंबांसहीत फिरतायेत रस्त्यावर

कर्जत तालुक्‍यात सुमारे 170 पेक्षा अधिक गावे आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी खारोड्या, पापड्या, पापड आदी खाद्यपदार्थ तयार करून त्याचा साठा केला जातो. त्याचप्रमाणे वर्षभर पुरेल इतका लाल मिरच्यांपासून गरम मसाला तयार करण्यात येतो; मात्र यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठ मंदावली असून, सरकारने देशभरात लॉकडाऊन, तसेच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे मिरची खरेदी करण्यासाठी फारसे ग्राहक येत नसल्याचे मिरची व्यापाऱ्यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? मुंबई महापालिकेकडून डायलिसीससाठी पाच केंद्रे

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या विक्रीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकने घट झाली आहे. त्यातच  लॉकडाऊन वाढल्याने यापुढे मिरची खरेदीसाठी  कितपत ग्राहक येतील याबाबत साशंकता आहे .
- पंकज परमार, मिरची व्यापारी, कर्जत बाजारपेठ

 • मिरचीचे दर   प्रति किलो 
 • काश्‍मिरी 330- 350 रुपये 
 • बेडगी 240 280 रुपये 
 • शंकेश्वरी 200 - 240 रुपये 
 • लवंगी 140 - 180 रुपये 
 • गंटुर 130 - 150 रुपये 
 • तेलपट्टी 250 - 280 रुपये 
 • ढोबळी 250 - 300 रुपये 
 • अंकुर 220 - 240 रुपये 
 • हळद 120 - 150 रुपये 
 • धणे 100 - 140 रुपये 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chilli sales drop by more than fifty percent due to lockdown